नागपूर – नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या युनिट क्र. 5, गुन्हे शाखा यांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत चार आरोपी अटक करण्यात आली असून, पीडित महिला सुरक्षित मुक्त करण्यात आली आहे.
१० ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ४:३० ते ९:०० वाजेपर्यंत पारडी ते भंडारा रोडवरील शेरे पंजाब रेस्टॉरंट अँड लॉजिंग येथे ही कारवाई करण्यात आली. समीक्षा संजय शेंडे, मनजित अजितसिंग भाटिया, सुरेदरसिंग जसवंतसिंग भाटिया, आणि शैलेंद्र गोविंदसिंग शेंगर अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मोबाईल, डीव्हीआर, रजिस्टर तसेच विविध प्रकारचे कॉन्डोम्स असून, त्याची एकूण किंमत 66,310 रुपये आहे. आरोपी आर्थिक लाभासाठी पीडित महिलांकडून देहव्यापार करून घेतल्याचे समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत आरोपी आणि जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील तपासणीसाठी पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
नागपूर पोलीस आयुक्तांनी शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करीविरोधात कडक कारवाई करत राहण्याचे आदेश दिले आहेत.