Published On : Tue, May 24th, 2022

जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आता आयकॅडचे आनलाईन एप

Advertisement

नागपूर – कोव्हीडमुळे एकूणच शिक्षणक्षेत्राची आणि शिक्षण पद्धतिची व्याख्या बदलली. शिक्षण क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचं महत्त्वं कमालीचं वाढलं. अश्यात आयकॅडनेही काळासोबत चालण्याचा निर्णय घेत जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आनलाईन एप सुरू केले. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांसाठी फार्स (एफएआरएस) आणि पालकांसाठी (पॅरेंट कनेक्ट एप) स्वतंत्र आनलाईन एप सुरू केले.

आयकॅडच्या सॉफ्टवेअर टीमने गेल्यावर्षी या मोहिमेला सुरुवात केली आणि त्याचे चांगले परिणाम आता बघायला मिळत आहेत. ५० लोकांच्या टीमने हे एप तयार केले आहेत. आयकॅडचे हे एप वापरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी या टीमने तब्बल दिड लाख प्रश्न बारकाईने तपासले आणि ते अपलोड केले आहेत. विद्यार्थ्यांचा खासगी डेटा क्लाऊडवर सुरक्षित असून पर्सनल लॉगइनच्या आधाराने विद्यार्थी तो डेटा कधीही बघू शकतात. त्यामुळे अभ्यासातील किरकोळ अडचणींसाठी किंवा प्रत्येक तासानुसार विषयाच्या नोट्स प्रत्यक्ष घेऊन फिरण्याची गरजच संपली आहे. यासाठी फक्त विद्यार्थ्यांकडे त्यांचा स्वतंत्र टॅबलेट असणे अनिवार्य आहे.

या एपमध्ये डिकोड – रोजच्या अभ्यासातील अडचणी, सरावाचे प्रश्न, रिवाईंड – विद्यार्थ्यांना स्वतः चाचणी तयार करण्याची सोय, स्ट्रॉंग बॉक्स – प्रत्येक चॅप्टरनुसार केव्हीवायपी आणि आलिम्पियाडमधील गेल्यावर्षीचे प्रश्न, विविध चाचण्या आणि एनॅलिसीस, यासारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. आयकॅड आनलाईन एपमध्ये ‘डिस्कव्हर स्टोरीज’ नावाचेही एक फिचर आहे. यात अभ्यासाचे निरनिराळे तंत्र आणि आयकॅडमधील तज्ज्ञ तसेच प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांची प्रोत्साहनपर व्याख्याने उपलब्ध करून दिली जातात. एसआरबी या फिचरमध्ये उत्तरांसोबत आणि उत्तरांशिवाय अश्या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणे शक्य आहे.

आयकॅडचे संचालक सारंग उपगन्लावार म्हणतात, ‘आयकॅडच्या आनलाईन सपोर्टची ही केवळ सुरुवात आहे. आमच्याकडे यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्यामुळे येत्या काळात बरेच नवे बदल एपवर बघायला मिळतील. एपद्वारे शिक्षण, चोवीस तास देखभाल आणि अपग्रेडेशन सपोर्ट मिळविण्यासाठी देखील या टीमने मदत केली.’

पाल्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी आता पालकांना प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज नाही. त्यासाठी ‘आयकॅड पॅरेंट कनेक्ट’ नावाचे स्वतंत्र एप विकसित करण्यात आले आहे. यावर पालक आपल्या पाल्यांची दैनंदिन प्रगती तपासू शकतात. त्यासोबतच ‘आयकॅड फॅकल्टी एप’च्या माध्यमातून प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांची प्रगती तपासून त्यानुसार पुढची दिशा ठरविणे सोपे झाले आहे.

आयकॅड अकेडेमिक ईआरपी आणि जेईई व नीटसाठी तयारी करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन करणारे फिचर्सही लवकरच घोषित करण्यात येतील, असे आयकॅडच्या व्यवस्थापनाने कळविले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांचं जगणं अधिक सुसह्य करण्याच्या दृष्टीनेच आयकॅड या विदर्भातील प्रथम क्रमांकाच्या संस्थेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे, हे महत्त्वाचे.