Published On : Sat, Jul 13th, 2019

आता पत्नीशिवाय जगु कसा पत्नीच्या विरहात मद्याच्या आहारी

Advertisement

तीन चिमुकल्यांना घेवून पत्नीच्या शोधात रेल्वे स्थानकावर

नागपूर: पत्नीवर त्याचे जीवापाळ प्रेम. कौटुबीक वादात पत्नी घर सोडून गेल्याने त्याला जगणेच असह्य झाले. आता पत्नीशिवाय जगु कसा? तिन चिमुकल्यांचा सांभाळ कसा करू? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. पत्नीच्या शोधात नागपूर रेल्वे स्थानकावर आला. मात्र, पत्नी मिळाली नाही, तिच्या विरहात तो दारूच्या नशेत पडून होता. आणि तिन चिमुकले त्याच्या जवळ बसून रडत होते. हा प्रकार आज शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मात्र लोहमार्ग पोलिस वेळीच त्याच्या मदतीला धावले.

कामठी निवासी राजेश (काल्पनिक नाव) मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि तीन मुली आहेत. मुली तिन्ही मुली चार वर्षाच्या आत. गुण्यागोंविंदाने संसाराचा रथ चालत असताना अचानक त्यांच्यात कौटुंबीक वाद झाला. वाद विकोपाला पोहोचल्याने पत्नी घर सोडून गेली. त्याने बराच शोध घेता मात्र, पत्नी कुठेच आढळून आली नाही. अखेर आज सकाळीच तो नागपूर रेल्वे स्थानकावर पत्नीच्या शोधात आला. सोबत तिन्ही चिमुकले होते.

पत्नीच्या विरहात त्याने चांगलीच ढोकसली. फलाट क्रमांक २ वर तो शुध्द नसलेल्या स्थितीत पडून होता. प्रवाशांना त्या चिमुकल्यांची दया आली. प्रवाशांनी त्या मुलींना खाऊ दिले. कसा तरी तो फलाट क्रमांक एकवर आला. याठिकाणी तो पडून होता तर मुली त्याच्या अवती भवती रडत होत्या.

हे दृष्य पाहून प्रवासी चिमुकल्यांना खावू देऊन जात. ही माहिती रेल्वे चाईल्ड लाईनला मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले तसेच लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चिमुकल्यांसह त्याला ठाण्यात आणले. तो शुध्दीवर येईपर्यंत ठाण्यातच ठेवले. शुध्दीवर येताच सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक संदीप जाधव आणि रोशन शेळके यांनी राजेशची समजुत काढली. त्याला धीर दिला. त्याचे समुपदेशन केले. तसेच मुलांना खाऊ दिले. मुलांना सांभाळेल एवढ्या शुध्दीवर अशोक येताच मुलांसह त्याला गाडीत पाठविले.