Published On : Tue, Jun 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वर्ल्डकप २०२३ चा एकही सामना होणार नाही; क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशा !

Advertisement

नागपूर : भारताच्या यजमान पदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक ICC कडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजता आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले.मात्र यंदा खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकपदरम्यान नागपुरात कोणत्याही सामन्याचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील क्रिकेट प्रेमी नाराज झाले आहे.

या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका २०२०-२३ ICC क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे होईल.हे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे येथे होतील. मात्र यजमान शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळाले नाही.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक-
पहिला सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
दुसरा सामना – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
तिसरा सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
चौथा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
पाचवा सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
सहावा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
सातवा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर २, २ नोव्हेंबर, मुंबई
आठवा सामना – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
नववा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर १, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू

Advertisement
Advertisement