Published On : Fri, Aug 9th, 2019

ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन

Advertisement

कामठी: विविध प्रलंबित मागण्यासाठी कामठी तालुका ग्रामसेवक युनियन च्या वतीने आज 9 ऑगस्ट ला क्रांती दिनी पंचायत समिती कार्यालय समोर असहकार आंदोलन करण्यात आले.

प्रलंबित मागण्याबाबत राज्यभरात विविध प्रकारचो आंदोलने करण्यात आली परंतु मागण्या मान्य न झाल्याने ग्रामसेवक पद रद्द करून पंचायत विकास अधिकारि पद निर्माण करणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदलवून पदवीधर ग्रामसेवक नेमणूक करणे, 2011 च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी सज्जे पदे वाढविणे, वेतन त्रुटी दूर करणे, 2005 नंतरच्या ग्रामसेवकाना जुनी पेन्शन लागू करणे या सर्व मागण्यासाठी ग्रामसेवकानी आजपासून असहकार आंदोलन पुकारण्यात आले असून आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्या.याप्रसंगी तालुक्यातील ग्रामसेवक संघ प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी