Published On : Fri, Aug 9th, 2019

शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करणारा उपक्रम : महापौर नंदा जिचकार

Advertisement

‘महापौर चषक’ वंदे मातरम्‌ समूहगान स्पर्धेचे उद्‌घाटन थाटात

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत व्हावा. त्यांना आपल्या स्वातंत्र्यामागील बलीदानाचे महत्व कळावे. देशप्रेम ही भावना त्यांच्याही मनात तेवत राहावी, याउद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समुहगान स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. क्रांती दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात येणा-या या उपक्रमामुळे संपूर्ण शहरात देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती होते, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.९) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. मंचावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, प्रभारी शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, स्पर्धेचे प्रशिक्षक आकांक्षा नगरकर, डॉ. रश्मी रायकर व भिमराव भोरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, वंदे मातरम् हे प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती जागविणारे स्फुर्तीगीत आहे. अनेक ठिकाणी ते पूर्ण गायले जात नाही. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण करण्यासह एकच गीत वेगवेगळ्या चालीत, वेगवेगळ्या वाद्यांच्या तालावर गायन करून या स्फुर्तीगीताला अधिक सन्मान देणारा हा उपक्रम आहे. शालेय जीवनात मुलांवर घडणारे संस्कार हे भविष्याची उत्तम निर्मिती करणारे ठरत असते. मनपाद्वारे मगील २३ वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाचे संस्कार रुजविले जात आहेत, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

प्रास्ताविकात शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी उपक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विषद केली. ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्य साधुन १९९६ ला तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर यांनी वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे आयोजन केले. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धेला भव्य स्वरूप प्रदान केले. तेव्हापासून सलग २३ वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी शहरातील मनपाच्या शाळांसह इतरही शंभरावर शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शाळांकडून देशभक्ती जागर केला जात आहे, असेही शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल यांनी मानले.

१६० शाळांचा सहभाग
‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली आहे. असून पहिल्या गटात इयत्ता ९वी ते १०वी, दुस-या गटात इयत्ता ६वी ते ८वी व तिस-या गटात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तिन्ही गटात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांसह इतर खासगी शाळांमधील १६० शाळांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी (ता.९) स्पर्धेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ९वी ते १०वी या पहिल्या गटाची प्राथमिक फेरी घेण्यात आली. यामध्ये मनपाच्या पाच शाळांसह एकूण २५ शाळांनी सहभाग घेतला. शनिवारी (ता.१०) गट क्रमांक दोनमधील इयत्ता ६वी ते ८वी आणि मंगळवारी (ता.१३) गट क्रमांक तीन इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटातील प्राथमिक फेरी होणार आहे. तिन्ही प्राथमिक फे-या झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहामध्ये होतील. तर १४ ऑगस्टला सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.

Advertisement
Advertisement