Published On : Sat, Jan 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महिमा बहुउद्देशीय संस्था द्वारे नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा वाढदिवस संपन्न

Advertisement

भारतीय बालहक्क चळवळकर्ते व नोबेल शांतता पारितोषिक विजेते तसेच बालमजूरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या बचपन बचाओ आंदोलनाचे प्रणेते आदरणीय कैलास सत्यार्थी यांचा वाढदिवस महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितल पाटील यांच्या अध्यक्षते खाली मानकापुर येथील राजनगर, झोपडपट्टी येथील आर्थिक परिस्थिती ने कमकुवत असलेल्या बालकांना वही, पेन चे वाटप करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी बालकांनी अगदी आनंदीत होऊन सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या संगीता किशोर वारके, महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सचिव- बरखा मदन सोंगले, शामला अशोक नायडू, गगन भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या बरखा पाटील, फिल ॲण्ड गूड फाऊंडेशनचे अभीमन्यु सर, संकेत देवगडे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक गणमान्य उपस्थित होते.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement