
नागपूर-नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी गुन्हेगारांना थेट इशारा देत, “गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. पोलिसांपासून फक्त गुन्हेगारांनीच घाबरावे, सामान्य नागरिकांनी नाही,” असा स्पष्ट संदेश दिला.
नांगरे पाटील यांनी सांगितले की, नागपूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, संघटित गुन्हेगारीवर आळा घालणे, अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर कारवाई करणे आणि महिला व बालकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी ‘सर्व्हिस’ ही भावना जपत पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी, कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. गुन्हेगारांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादावर प्रथमच भाष्य करताना नांगरे पाटील म्हणाले की, गेल्या तीन दशकांपासून विविध धर्म, सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहत आले आहेत. त्या कार्यक्रमात त्यांनी युवकांना व्यसनमुक्ती, समाजसेवा आणि पोलीस सेवेत करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले होते. “माझी निष्ठा केवळ भारतीय राज्यघटनेशी असून, मी संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
याशिवाय, कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांना कायद्याचा कठोर बडगा दाखवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांचे मनोबल उंचावणे, तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करणे आणि नागरिकांशी समन्वय वाढवून सुरक्षित नागपूर घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
नाशिकसह राज्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर प्रभावी कामगिरी बजावलेल्या विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिसांच्या कामकाजात अधिक वेग, शिस्त आणि जनतेचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Chitaroli Nagpur : नागपुर के बप्पा आखिर बनते कहाँ हैं?
NEET विवाद पर युवाओं की राय, विशेषज्ञों से मंथन
RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid...
चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...
दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...
लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...




