Published On : Mon, Feb 26th, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिना निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

Advertisement


नागपूर: भारतीय स्वातंत्र्य लढयाचे यज्ञकुंड धगधगते ठेवण्यासाठी क्रांतीकारकाचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांनी साहित्यातून जनजागरण केले. केवळ, सावरकर बंधु नव्हे तर त्यांच्या घरातील स्त्रीयांचा त्याग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या 52 व्या आत्मार्पण स्मृती दिना निमित्त शंकर नगर चौक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने मा. महापौर नंदा जिचकार व मा. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, झोन सभापती रुपा राय, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेवक सुनिल हिरणवार, निशांत गांधी व नगरसेविका उज्वला शर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सर्वश्री शिरिष दामले, मुकंद पाचखेडे, डॉ. अजय कुळकर्णी, प्रा. प्रमोद सोवनी, रवीन्द्र कासखेडीकर, डॉ. राजाभाऊ शीलेदार, डॉ. केशव क्षीरसागर, रा. स्व. संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक तसेच कठाळे परिवाराचे सदस्य उपस्थित होते तसेच स्वा. सावरकरांचे वेषभूशेत सर्जेराव गलपट व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत.


यावेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी पुतळा सौदर्यीकरणाबाबत माहिती देवून सर्वसंबंधीतांचे आभार मानले. वंदेमातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

तसेच म.न.पा.केन्द्रीय कर्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दालनात मा.महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी हिवताप नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, उप अभियंता राजेश दुपारे, रामक्रष्णा लाडे आदी उपस्थीत होते.