Published On : Mon, Feb 26th, 2018

प्रभाग 15 मध्ये स्वच्छता अभियान

Advertisement

नागपूर: स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहराच्या निरनिराळया भागात साफ-सफाई मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज सकाळी धरमपेठ गवलीपूरा प्रभाग क्र. 15 कचरा साफ करुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आली. सफाई अभियानामध्ये परिसरातील नागरीक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

झोन सभापती रुपा राय, सभापती स्थापत्य समिती संजय बंगाले, प्रभागाचे नगरसेवक सुनिल हिरणवार, नगरसेविका उज्वला शर्मा यांच्या नेतत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी गवळीपूरा धरमपेठ परिसर स्वच्छ करुन या अभियानाला सुरुवात केली तसेच त्यासाठी अभय दिक्षीत, हेमराज हिरणवार, जगदीश हिरणवार, ज्योती चौरसीया यांनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement