Published On : Wed, May 3rd, 2017

महिला उद्योजक निर्मितीसाठी “प्रशिक्षण आपल्या दारी” योजना


नागपूर: केंद्र व राज्य सरकारतर्फे तसेच नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्योजक विकासासाठी राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने लवकरच नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग स्तरावर विविध उद्योजकता विकास व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी दिले. मनपा मुख्यालयात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती गरजुंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या समितीची असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी सूचनाही यावेळी सभापतींनी केली. बैठकीच्या विषय पत्रिकेचे वाचन उपसभापती श्रद्धा पाठक यांनी केले. यावेळी समिती सदस्या लक्ष्मी यादव, दिव्या धुरडे, वंदना भगत, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समाजकल्याण विभागाच्या शारदा गडकर, एमआय़एस तज्ज्ञ नुतन मोरे, एनयूएलएमचे प्रमोद खोब्रागडे, शिक्षण विभागाचे सहा. शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, सहा. शिक्षणाधिकारी मीना गुप्ता, आरोग्य विभागाचे डॉ. विजय तिवारी आदी अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.

महिला व बालकल्याण विभागांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणा-या विविध योजना आणि सेवांची माहिती यावेळी समिती सदस्यांनी जाणून घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाच्या कर्मचा-यांनी मनपाची लाडली लक्ष्मी योजना, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन, महिला मेळावा, जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम, शिवनयंत्र वाटप तसेच महिलांसाठी उपलब्ध विविध कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर आदींची माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांनी महिला बचत गटांच्या स्थापनेची प्रक्रिया तसेच त्यांना सरकारतर्फे करण्यात येणारे आर्थिक सहाय्य आणि गटांची पात्रता, उद्योग उभारणे, कर्ज मिळवून देणे आणि समाज कल्याण विभागाच्या जबाबदा-यांबद्दल जाणून घेतले. तसेच गरजुंना वेळेत मदत मिळावी यासाठी समाजकल्याण विभागाने प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी सभापती वर्षा ठाकरे यांनी दिले. 2016-2017 आर्थिक वर्षापर्यंत 1017 बचत गटांची नोंदणी समाज कल्याण विभागाकडे असून आता पर्यंत एएलएफ अंतर्गत 6 लाख 50 हजार रुपयांचे आणि 333 गटांना 32 लाख 30 हजारांचे आर्थिक सहाय्य करण्यात आल्याची माहिती यावेळी समाजकल्याण विभागातील अधिका-यांनी दिली. यावेळी मनपाच्या सर्व दहा झोन मध्ये सुरु असलेल्या समउपदेश केंद्रांची माहिती आणि त्यांच्या कार्याबद्दलही सदस्यांनी माहिती जाणून घेतली. झोन निहाय प्रशिक्षण शिबीराचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसून यासाठी प्रशिक्षण आपल्या दारी योजना सुरु करण्याची गरज असून योजनेची आखणी करुन लवकरच सुरुवात करण्यात यावी असे निर्देश सभापतींनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement