Published On : Wed, Mar 21st, 2018

उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा सज्ज

Advertisement


नागपूर: उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई रोखण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून बुधवार (ता.२१) नागपूर महानगरपालिकेचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके आणि उपसभापती श्रद्धा पाठक यांनी पेंच धरणाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा जाणून घेतला.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता मो.इजराईल, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्लूचे प्रवीण शरण, अनंता बावीस्कर, प्रदीप कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर शहराला पेंच धरणातून पाणीसाठा उपलब्ध होतो. त्याची सद्यस्थिती व धरणाची देखभाल कशी होते याचा आढावा मान्यवरांनी घेतला. शहराला दररोज महिनाकाठी १५ दशलक्ष घनलिटर पाणी साठा लागतो. आतापर्यंत पेंच धरणामध्ये संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महाव्यवस्थापक दिलीप टिपणीस यांनी दिली. याव्यतिरिक्त तेथील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या समस्या सभापती पिंटू झलके यांनी जाणून घेतल्या. धरणातील सहा मशीन्स कार्यान्वित असून तेथे विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्याची सूचना सभापती पिंटू झलके यांनी केली. पेंच धरणातील जलसाठा, पंप हाऊस याची पाहणी मान्यवरांनी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement