Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपातर्फे गोंड राजे बख्त बुलंद शाह यांना विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर, : नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांना जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापौर श्रीमती निता ठाकरे,उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी विधान भवन चौक स्थित गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदान दिवस व चिमासाहेब भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपाच्या उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी रामनगर चौक स्थित शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि रघुजीनगर ताजबाग चौक येथील चिमासाहेब भोसले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे कर्मचारी, अग्निशमन जवान व नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.