Published On : Thu, Nov 23rd, 2017

गोवारी शहिदांना म.न.पा. तर्फे श्रध्दांजली

Gowari Martyrs, NMC, Nagpur News, Nagpur
नागपूर: २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११४ आदीवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यांचा शहीद दिवस म्हणून झोरो मॉईल्स जवळील शहीद स्मारक येथे नगरीच्या महापौर नंदा जिचकार, आमदार आशिष देशमुख, झोन सभापती रुपा रॉय, नगरसेवक संजय बंगाळे, सुनिल हिरणवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजल दिली.

याप्रसंगी कैलाश राऊत, शालिक नेवारे, शेखर लसुनते समाजाचे नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.