Published On : Mon, Aug 26th, 2019

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे शटडाऊन २७ ऑगस्ट रोजी

Advertisement

नेहरू नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन व मंगळवारी झोनचा काही भाग राहणार बाधित

बाधित भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठाही राहणार बंद

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले
आहे. हे शटडाऊन २७ ऑगस्ट सकाळी १० ते २८ ऑगस्ट सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल.

१. या शटडाऊन दरम्यान कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या ९०० मिमी वाहिनीवर वर्धमान नगर येथे उद्भवलेली गळती दुरुस्त करण्यात येईल व

२. सुभान नगर जलकुंभाच्या इनलेट स्लुईस व्हॉल्वची दुरुस्तीदेखील करण्यात येईल.

या दुरुस्तीच्या कामांसोबतच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र परिसरात उच्च दाब (High Tension/HT cable विद्युतवाहिनी टाकण्यात येईल:APFC panel व इतर केबल्स टाकण्याची देखभालीची (मेंटेनन्स) कामेही करण्यात येतील. ही कामे MERC च्या नियमांनुसार पावर फॅक्टर कमी करून विद्युत संवर्धन करण्यात मदत करतील.

या शटडाऊन दरम्यान नेहरू नगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन व मंगळवारी झोनचा काही भाग येथील पाणीपुरवठा बाधित राहील.

मनपा व OCW ने उपरोक्त भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.