Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 11th, 2020

  महानगरपालिकेच्या स्थापना दिनी १८३० ऐवजदारांना स्थायी करण्याचे महापौरांचे आदेश

  नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेतील अस्थायी, ऐवजदार कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत पारीतही करण्यात आला होता. यासंदर्भात आढावा घेत आतापर्यंत पूर्णपणे कार्यवाही झालेल्या पात्र २१६३ ऐवजदारांपैकी १८३० ऐवजदारांना स्थायी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

  यासंदर्भात होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मंगळवारी (ता. ११) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती श्री.धर्मपाल मेश्राम, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सतीश होले, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यावेळी उपस्थित होते.

  नागपूर महापालिकेतील अस्थायी, ऐवजदार कर्मचारी ज्यांच्याकडे मूळ ऐवजदार कार्ड असेल आणि ज्यांची २० वर्षांची नियमित सेवा झाली आहे त्यांना स्थायी करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० सप्टेंबर २०१९ रोजी दिले होते. यासंदर्भात १३ डिसेंबर २०१९ रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांनी ३१ जानेवारी २०२० पावेतो स्थायी करण्यासंबंधी आदेश देण्याचे निर्देश दिले होते. ही कार्यवाही कुठपर्यंत आली याबाबत महापौरांनी मंगळवारी (ता. ११) प्रशासनाकडून आढावा घेतला.

  यासंदर्भात उपायुक्त निर्भय जैन म्हणाले, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने २८ नोव्हेंबर २०१९रोजी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त-२, सहायक आयुक्त (साप्रवि), विधी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या बैठकीत झोननिहाय सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करून सूचना फलकावर प्रकाशित करण्याबाबत निर्देश दिले होते. सद्यस्थितीत नागपूर महानगरपालिकेत ४३४७ इतके ऐवजदार कर्मचारी कार्यरत आहेत.

  झोन क्र. १ ते १० मार्फत एकूण २१६३ कर्मचाऱ्यांच्या नस्ती प्राप्त झाल्या. त्यापैकी काही नस्तींमध्ये त्रुट्या आढळल्याने त्या परत पाठविल्या. त्या नस्ती सुधारीत करून लक्ष्मीनगर झोन २२०, हनुमाननगर झोन २२३, धंतोली झोन २८४, गांधीबाग झोन ३०० अशा एकूण १०२७ नस्ती प्राप्त झाल्या आहेत. धरमपेठ झोनतर्फे २२० पैकी १८८, सतरंजीपुरा झोनतर्फे २५० पैकी १४६, नेहरूनगर झोनतर्फे २३४, लकडगंज झोनतर्फे ३३५ पैकी ९५, आशीनगर झोनतर्फे ३५० पैकी ९० आणि मंगळवारी झोनतर्फे २७० पैकी ५० अशा एकूण ८०३ नस्ती आज सादर करण्यात येणार आहे.

  प्राप्त १०२७ आणि मंगळवारी प्राप्त होणाऱ्या ८०३ अशा एकूण १८३० कर्मचाऱ्यांच्या नस्ती १४ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांकडे पाठविण्यात याव्या. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर पुढील आठ दिवसांत स्थायी आदेश काढून २ मार्च रोजी अर्थात महानगरपालिकेच्या स्थापना दिवशी कविवर्य सुरेश भट सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करून त्यात वितरीत करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिले. यानंतर ३१ जानेवारी आणि त्यानंतर ३१ मार्च पर्यंत ज्यांच्या सेवा २० वर्षाच्या होतील, त्यांना स्थायी करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

  मृत ऐवजदारांच्या वारसानांची प्रकरणेही तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले. बैठकीला एम.बी.एम सेवासंघचे सतिश सिरस्वान, अजय हाथीबेड, सत्यम चंदनखेडे, नुतण शेन्दुरर्णीकर व सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल आरोग्य अधिकारी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145