Published On : Tue, Feb 11th, 2020

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे प्रा. अंकिता पिसुदे ला श्रध्दांजली

कन्हान : – प्राध्यापिका तरुणीला एका युवकाने जिवंत जाळल्याने उपचार दरम्यान तिचा मुत्यु झाल्याने या अमानु ष्य कृत्यांचा मराठा सेवा संघ कन्हान व्दारे निषेध करून मृतक तरूणी ला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सोमवार (दि.१०) ला रात्री ९ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय तारसा रोड कन्हान येथे श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करून वर्धा जिल्हयातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका तरुणीला 3 फेब्रुवारी ला महाविद्यालयाकडे जात असताना सकाळी साढे सात वाजता भर चौकात २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगा वर पेट्रोल ओतून विकी नगराळे या नराधमाने पेटवून दिले. नागरिकांनी धावुन वाचविण्याचा पर्यंत्न केला परंतु ती ४० टक्के भाजल्याने नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून तिची मुत्युशी झुंज सुरू असलेली अखेर सोमवारी सकाळी ६.५५ ला तिने अखेरचा श्वास घेतला.

मुत्युक प्राध्यापिका अंकिता पिसुदे च्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प वाहुन भावभिन श्रध्दांजली अर्पण करून या अमानुष्य कृत्याकरिता आरोपीस त्वरित फांसी दयावी. या मागणीसह मौन धारण करून श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी शांताराम जळते, मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, संदीप कुकडे, राकेश घोडमारे, राजु रेंघे, पवन माने, आंनद इंगोले, शुशिल ठाकरे, ऋृतिक रेंघे, अमोल डेंगे सह सदस्य उपस्थित होते.