Published On : Mon, Mar 16th, 2020

मनपा आयुक्तांचा जनता दरबार स्थगित

नागपूर :नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा जनता दरबार दररोज दुपारी ४ ते ५ या वेळात होत असतो. मात्र, सोमवार १६ मार्चपासून हा जनता दरबार स्थगित करण्यात आला आहे.

‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रसार बघता आणि त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जेथे गर्दी होईल, असे कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जनता दरबारात दररोज शेकडो नागरिक आपली कैफियत मांडण्यासाठी येतात. यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शासनाच्या दिशानिर्देशानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर जनता दरबार स्थगित केला आहे.