Published On : Tue, Mar 31st, 2020

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिल

Advertisement

मनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई

नागपूर : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटर सिल करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरातील जरीपटका येथील जनता हॉस्पिटल, रामदासपेठ येथील रेनबो मेडिनोवा डायगनोस्टीक सेंटर यासह रामदासपेठ येथील पेनोरमा एम.आय.आर. सेंटर येथे शहरातील काही कोरोनाग्रस्त उपचार करण्यात आले होते.

यासंदर्भात माहिती मिळताच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटरचे निर्जंतुकीकरण करून ते सिल करण्यात आले आहेत, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार दिली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सदर हॉस्पिटल संदर्भात आरोग्य विभागातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.