Published On : Thu, Aug 20th, 2020

नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात

t

आजमगढ़– उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे.

यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे

Advertisement

आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला न जुमानता डॉ.नितीन राऊत त्या ठिकाणी रस्त्यावर खाली बसून शांततेच्या मार्गाने ह्या कृत्याचा विरोध करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement