Published On : Fri, Jun 21st, 2019

जागतिक योग दिवस : नागपूरमध्ये नितीन गडकरींचाही योगाभ्यास

नागपूर : आज २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी योगासनांचे आयोजन करण्यात आलंय.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही योगाभ्यास केला. आरएसएसकडून जागतिक योग दिवसानिमित्तानं आरएसएसच्या रेशिमबाग परिसरातील हगडेवार स्मृती भवनात हा दिवस साजरा करण्यात आला.

आरएसएसची सहकारी संघटना आरोग्य भारतीकडून जागतिक योग दिवसानिमित्तानं हेगडेवार स्मृती भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

आरएसएसच्या स्वयंसेवकासहीत इतर अनेक सहकारी संघटनेच्या स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.