Published On : Thu, Oct 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात २५ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

Advertisement

नागपुरात २५ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी नागपुरातील महाल येथील गडकरी वाडा येथे जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ते नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणार आहेत.

सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नागरिकांना गडकरी यांची भेट घेता येणार असून, या दरम्यान ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील. नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि अडचणींबाबतची लेखी निवेदने आवश्यक कागदपत्रांसह आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यानंतर दुपारी १ ते २ या वेळेत गडकरी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. हा कार्यक्रम महाल येथील गडकरी वाड्यातील जनसंपर्क कार्यालयात होणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.