Published On : Thu, Oct 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

धंतोलीत कचरा गाडी चालकाला मारहाण; बोलेरो सवारांनी वाहनाच्या काचा फोडल्या

Advertisement

धंतोलीत कचरा गाडी चालकाला मारहाण; बोलेरो सवारांनी वाहनाच्या काचा फोडल्या

नागपूर : शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा संकलन करणाऱ्या वाहनाच्या चालकाला मारहाण करून वाहनाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. दुर्गंधी येत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पांढऱ्या बोलेरोमधील दोघांनी चालकाला शिवीगाळ करत बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय खांडेकर हे महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये कचरा संकलन करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास एफसीआय गोदामाजवळ कचरा गाडीतून दुर्गंधी येत असल्याच्या कारणावरून त्यांचा बोलेरोमधील व्यक्तींशी वाद झाला.

या वेळी बोलेरो चालक आणि त्याच्या साथीदाराने संजय खांडेकर यांना अश्लील शिवीगाळ केली. खांडेकर यांनी विरोध केल्यानंतर आरोपींनी वाहनातून बांबू काढून त्यांच्या दोन्ही हातांच्या मनगटावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर कचरा गाडीच्या काचाही फोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी धंतोली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पांढऱ्या बोलेरोमधील चालक आणि त्याच्या साथीदाराची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.