Published On : Wed, Dec 5th, 2018

दक्षिण नागपुरातील ९ अनधिकृत धार्मिक स्थळावर नासुप्रची कार्यवाही

Advertisement

नागपूर : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. अश्विन मुद्द्गगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधिक्षक अभियंता (मुख्यालय) श्री. सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात दिनांक ०४.१२.२०१८ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

मौजा चिखली (खुर्द) येथील
१) शिव नाग मंदिर, संजय गांधी नगर, रिंग रोड
२) हनुमान मंदिर, श्री शिवशक्ती को. ऑप. हौ. सोसायटी
३) पुरातन हनुमान मंदिर, अन्नपूर्णा गृ.नि.स संस्था
४) जय माता + नाग मंदिर, निवास को. ऑप. हौ. सोसायटी
५) नाग + शिवलिंग मंदिर, गुरुकृपा गृ.नि.स संस्था
६) हनुमान मंदिर, श्री समर्थ गजानन गृ.नि.स संस्था
७) गणपती + नागोबा मंदिर, बाळाभाऊपेठ
८) नाग मंदिर, सुवर्णा को. ऑप. हौ. सोसायटी
९) नाग मंदिर, नागरिक सुविचार को. ऑप. हौ. सोसायटी

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या धार्मिक स्थळांचा समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली त्यांनी सामंजस्यपणा दाखवित मंदिरामधील मूर्ती स्वतः काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले. अश्या एकूण ९ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही ३ टिप्पर आणि २ जेसीबी च्या साहाय्याने आज सकाळी १०.३० ते सायकांळी ६.०० वाजेपर्यंत करण्यात आली.

यावेळी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री अविनाश प्र बडगे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श्रीमती यशोधरा माणिक, श्री रवी रामटेके, श्री. विनोद खुळगे व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement