Published On : Wed, Apr 22nd, 2020

कोरोना संदर्भात कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर

Advertisement

कामठी:- कोरोना रोगाचे वाढते संक्रमण बघून तालुका आरोग्य विभागाचे वतीने कोरोना रोगावर उपाय योजना संदर्भात तहसील कार्यालयात आशा वर्कर,अंगण वाडीसेविका व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

कामठी शहर व ग्रामीण भागात कोरोना रोगाचे वाढते संक्रमण बघता त्यावर तालुका प्रशासनाच्यावतीने वेळीच उपायोजना करण्यात याव्यात याकरिता तहसील कार्यालयात आरोग्य विभागाच्या विभागाचे वतीने तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर , गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमाकांत डाके , नगर परिषद कामठी नागरी आरोग्य केंद्राचे डॉ शबनम खानुनी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ धीरज चोखानद्रे,नायब तहसिलदार सुनील तरुडकर , रणजित दुसावार याचे उपस्थितीत आयोजित प्रशिक्षण शिबिरात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर यांनी आपण ज्या परिसरात सर्वे किंवा आरोग्यासंदर्भात नोंदणी करण्याकरिता जानार आहेत त्या परिसरातील नागरिकांना तोंडाला मास्क किंवा कापड बांधने, घरा बाहेर न निघणे घरातच राहावे, बाहेरून आल्यानंतर साबणाने हात धुणे ,समान अंतर ठेवून एकमेकाशी संवाद साधणे ,आपल्या परिसरात एखाद्या व्यक्तीला सर्दी ,खासी ,खोकला, ताप येत असतील त्याविषयी त्वरित माहिती देणे ,कोरोना सारख्या एखाद्या रोगाचे लक्षण असलेल्या व्यक्ती दिसून आल्यास त्या व्यक्ती संबंधात सदर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी यांना माहिती देणे व त्या व्यक्तीस आरोग्यतपासणी करण्यासाठी रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यासाठी त्वरित माहिती देणे या विषयावर प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षण शिबिरा मोठ्या संख्येनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , आरोग्य विभागाचे कर्मचारी उस्थित होते

संदीप कांबळे