Published On : Thu, Jul 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

उमरेडमध्ये नीलगायीची शिकार;संघटित शिकारी टोळीचा पर्दाफाश,एकाला अटक

Advertisement

नागपूर– वन्यजीवांच्या अवैध शिकारीविरोधात वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत उमरेड उत्तर वनपरिक्षेत्रातील मौजा उटी येथे सक्रिय असलेल्या संघटित शिकारी टोळीचा पर्दाफाश केला. पहाटे टाकलेल्या छाप्यात एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली, तर त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. कारवाईदरम्यान तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, नीलगायीचे अवयव आणि मांसाची तस्करी करण्याच्या तयारीत ही टोळी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख हेवती (उमरेड) येथील अभिषेक उर्फ अभिशेखर पुनाराम अडीले (वय 38) अशी असून, त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोळी झाडून नीलगायीची हत्या-
वन विभागाला उटी बीटमधील एका शेतात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून छापा टाकला. तपासात सुमारे चार वर्षांची, ८० किलो वजनाची नर नीलगाय बंदुकीच्या गोळीने ठार मारण्यात आल्याचे उघड झाले. आरोपी नीलगायीची कातडी, पाय आणि मांस कापून नेण्याच्या तयारीत असतानाच पथकाने धाड टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले.

फॉरेन्सिक तपासासाठी नमुने जप्त-
घटनेनंतर शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा हिवरकर यांनी घटनास्थळी नीलगायीच्या अवशेषांचे शवविच्छेदन केले. पुढील वैज्ञानिक तपासासाठी आवश्यक नमुने जप्त करून सील करण्यात आले आहेत. शिकार करण्यासाठी वापरलेल्या शस्त्रासह इतर पुराव्यांचा फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे.

Advertisement

शिकारी रॅकेटचा शोध सुरू-
उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनसंरक्षक मनोज धनविजय यांच्या नेतृत्वात उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे तसेच वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणामागे संघटित शिकारी टोळी कार्यरत असल्याचा वन विभागाला संशय असून, फरार आरोपींचा शोध, शिकारासाठी वापरलेल्या शस्त्रांचा स्रोत, वन्यजीवांच्या अवयवांच्या संभाव्य तस्करीचे जाळे आणि संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी आरोपींवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.