Published On : Thu, Jul 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कारवाई होतेय… पण माहिती का लपवली जातेय? नागपूर FDA च्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह

Advertisement

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई करत असल्याचा दावा करत आहे. मात्र, या कारवायांइतकाच गंभीर प्रश्न आता त्या कारवायांबाबतची गोपनीयता आणि पारदर्शकतेचा अभाव यावर उपस्थित होत आहे.

उत्तर नागपूरातील यादव नगर येथील डोमिनोज पिझ्झा आउटलेटवर FDA ने कारवाई केल्यानंतर नागपूर टुडेने विभागाचे सहआयुक्त तथा न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे कारवाईची अधिकृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितले,

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“अशा तपासण्या आम्ही अनेक ठिकाणी करतो. प्रत्येक माहिती माध्यमांना कशी देणार?”

या उत्तरानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Advertisement

जर तपासणी आणि कारवाई जनहितासाठी केली जात असेल, तर त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास आक्षेप का? नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये पारदर्शकता ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? माध्यमांनी माहिती विचारल्यावर ती देण्यास टाळाटाळ का केली जाते?

याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शहरातील काही मोठ्या प्रतिष्ठानांना कथितरित्या केवळ इशारा देऊन सोडण्यात आल्याची चर्चा आहे. तसे असेल, तर कठोर कारवाई का झाली नाही? नियम सर्वांसाठी समान आहेत की काही प्रतिष्ठानांसाठी वेगळे निकष लागू होतात? या प्रश्नांची उत्तरेही जनतेला अपेक्षित आहेत.

राज्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध गुटखा, तंबाखू आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्यभर अन्नसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र, नागपूरमध्ये कारवाई झाली असेल तर तिची माहिती सार्वजनिक करण्यात संकोच का? पारदर्शकतेमुळे विभागावरील विश्वास वाढेल, संशय नाही.

नागपूर टुडेचा प्रश्न इतकाच आहे—कारवाई झाली का, किती झाली, कोणावर झाली आणि त्याचे निष्कर्ष काय? कारण नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक कारवाईची माहिती जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे.

प्रशासन जितके पारदर्शक असेल, तितकाच जनतेचा विश्वास अधिक मजबूत होईल. त्यामुळे नागपूर FDA ने या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडणे आणि कारवायांची अधिकृत माहिती वेळोवेळी सार्वजनिक करणे, ही काळाची गरज आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.