Published On : Wed, Feb 10th, 2021

NHAI-मनपाचे आंतरजोडणीच्या कामासाठी २४ तासांचे शटडाऊन १२ फेब्रूवारी रोजी

लकडगंज झोनमधील देशपांडे ले आउट आणि लकडगंज जलकुंभांचा पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बाधित

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी मानेवाडा चौक येथे नवीन ५०० मिमी व्यासाच्या वाहिनीची आंतरजोडणी जुन्या ७०० मिमी व्यासाच्या वाहिनीशी करण्यासाठी २४ तासांच्या शटडाऊनची विनंती केली आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग ६ वर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याचे काम करत आहे. याचाच भाग म्हणून ‘युटीलिटी शिफ्टिंग’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या याकामाला २४ तासांचा अवधी लागेल. हे काम 12 फेब्रू, २०२१ रोजी सकाळी १० वाजता ते १३ फेब्रू सकाळी १० वाजेपर्यंत वाठोडा -मानेवाडा चौक रिंग रोड वरील नाग नदीजवळ सुरु होईल.

Advertisement

या २४ तास शटडाऊन दरम्यान शनिवारी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
देशपांडे ले आउट जलकुंभ : देशपांडे ले आउट, त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर, पूर्व वर्धमाननगर , प्रजापती नगर , नेहरू नगर, शरद नगर, देवी नगर, संघर्ष नगर, वाठोडा , सदा शिव नगर, घर संसार सोसायटी, कामाक्षी नगर, शैलेश नगर.

Advertisement

लकडगंज -१ जलकुंभ: हिवरी नगर, LIG, MIG कॉलिनी, पडोले नगर, पद्लोए नगर वस्ती, पंठेर नगर, EWS कॉलोनी, शिवाजी सोसायटी.

– गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता ११ फेब्रुवारी रोजी
नागपूर १० Feb, २०२१: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोनमधील सर्व जलकुंभ स्वच्छता ११ फेब्रुवारी ते २६ शुक्रवार दरम्यान स्वच्छ करण्याचे ठरविले आहे.

यांतर्गत गायत्री नगर जलकुंभ ११ फेब्रुवारी (गुरुवार), खामला (पांडे लेआऊट) जलकुंभ १३ फेब्रुवारी (शनिवार), लक्ष्मी नगर नवे जलकुंभ १५ फेब्रुवारी (सोमवार), लक्ष्मी नगर जुने जलकुंभ १७ फेब्रुवारी (बुधवार), टाकळी सीम जलकुंभ व टाकळी सीम संप (हिंगणा टी-पॉइंट) २० फेब्रुवारी (शुक्रवार), प्रताप नगर जलकुंभ २२ फेब्रुवारी (सोमवार), त्रिमूर्ती नगर नवे जलकुंभ २४ फेब्रुवारी (बुधवार) व जयताळा संप २६ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

जलकुंभ स्वच्छतेमुळे बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे
गायत्री नगर ११ फेब्रुवारी (गुरुवार): बंडू सोनी लेआऊट, पठाण लेआऊट, तुकडोजी नगर, कामगार कॉलोनी, IT पार्क, गायत्री नगर, विद्या विहार, गोपाल नगर, विजय नगर, VRCE कॅम्पस, पडोळे लेआऊट, गजानन नगर, मणी लेआऊट, SBI कॉलोनी, श्री नगर, करीम लेआऊट, उस्मान लेआऊट, NPTI, परसोडी, ई.

शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement