शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन वणी पोलीसात झाला होता गुन्हा दाखल,आणखी मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता
वणी – वणी येथिल जि.एस.आईल मिल कंपनीतुन तब्बल 11 करोड 23 लाख 99 हजार रुपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते.या प्रकरणी दि.2 /1/2020 जानेवारी गुरुवारला सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकांनी वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली होती.या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी अद्ण्यात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला होता .
मनोजकुमार अग्रवाल उर्फ मखरीया हे मँनेजिंग डायरेक्टर असलेल्या या जि.एस.आईल मिल कंपनीत संजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया,अजयकुमार अग्रवाल उर्फ मखरीया व उमेशकुमार अग्रवाल उर्फ मखरीया ईत्यादी संचालक होते.हि कंपनी सुरु करतांना या संचालकांनी आदिलाबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीया या शाखेतुन 220 करोड 95 लाख रुपये कर्जाची उचल केली होती.
परंतु 11 जुलै 2012 पासुन या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने नियमीत कर्जाची फेड न केल्याने जि.एस.आईल मिलचे खाते एनपिए झाले.परिणामी बँकेने आदिलाबाद व वणी येथिल कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या.यानंतर जुन 2017 मध्ये सदर प्रकरण बँकेच्या सिकंदराबाद शाखेत गेल्यानंतर वणी येथिल जि.एस.आईल मिल मध्ये तैनात असलेले सुरक्षा रक्षक काढुन घेतले.
परिणामी वणी परिसरातील भंगार चोरट्यांनी या कंपनीला टार्गेट केले होते.विशेष म्हणजे चोरट्यांनी मशिनचा वापर करुन दिवसा ढवळ्या या कंपनीतील साहित्यांच्या चोरीचा धुमाकुळ घातला होता.
यादरम्यान 9 फेब्रुवारी 2017 ते 10 मार्च 2018 पर्यंत या कंपनीलील सुमारे 11 कोटी 23 लाख 99 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
या घटनेची माहीती बँकेचे संचालक मनोज मखरिया यांना मिळताच त्यांनी बँकेत जावुन कंपनीतील साहित्यांची चोरी होत असल्याची माहीती दिली होती.परिणामी दि.2 जानेवारी गुरुवारला सिकंदराबाद येथिल स्टेट बँक आँफ इंडीयाचे व्यवस्थापक राधाक्रुष्ण मुक्कटीश्वरराव संका(55)यांनी वणी पोलीस ठाणे गाठुन साहित्य चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीवरुन वणी पोलीसांनी भादंवी 379,380,452,457 ,34 अन्वये चोरीचा गुन्हा नोंद केला होता.
तरी आज या प्रकरणामध्ये ,मुख्य सुत्रधार शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद(49) याला या प्रकरणात अटक करुन, पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ , अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोऊपनि गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी पार पाडली
