Published On : Thu, Jul 11th, 2019

अबब !महामार्गावरच चक्क दिसला वाघ.

Advertisement

वाघांची सुरक्षा धोक्यात वनविभागाचे दुर्लक्ष कारणीभूत . वन्यजीव किती सुरक्षित

रामटेक : जबलपुर महामार्गावरील रामटेक देवलापार परिसरातील बांद्रा शिवारात चक्क मोठा वाघ दिसला. त्याचवेळेस या मार्गाने जाणार्‍यांना हा वाघ अगदी जवळुन बघता आला. काही हौसींनी तो आपल्या मोबाईल मध्ये कैद करुन वायरल केला.

परंतू या घटनेने पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट, अन्य वन्यजीव किती सुरक्षित आहेत? यावर योग्य उपाययोजना करण्याची वेळ यानिमित्ताने नक्कीच आली आहे.

घनदाट जंगल असलेला हा परिसर पेंच व्याघ्र प्रकल्पात मोडतो. या प्रकल्पातील प्राण्यांचे मध्यप्रदेशातील कान्हा केसरीच्या जंगलापर्यंत वावर असतो. त्यासाठी प्राण्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. याकरिता काही ठिकाणी अंडरपास बनविण्यांत आले आहे.परंतु याचा उपयौग प्राण्यांना किती होतो? हे प्राणी आणि वनविभागच जाणोत.

या महामार्गाचे नुकतेच चौपदरीकरण करुन सिमेंटीकरण करण्यांत आले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी खुप वाढली आहे. मार्गाच्या मधोमध रस्ता दुभाजक बॅरिकेटस लावले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडतांना अवघड होते. उड्या मारु शकणारे प्राणी बॅरिकेटस वरुन उडी मारुन पलीकडे जाऊशकतात.परंतु बाकी प्राण्यांना हे शक्य होत नाही. अश्यावेळी रस्त्याच्या मधोमध आलेले प्राणी गोंधळतात. मग मागे वळतात. अश्यावेळी भरधाव येणार्‍या वाहनांचे बळी ठरतात. अश्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अज्ञात वाहने टक्कर मारुन पळुन जातात.

यात काही प्राणी जख्मी होऊन जंगलात दिसेनासे होतात. काहींचे मृतदेहच हाती लागले होते. वाघ जख्मी होउन अधिक हिंसक झाल्याच्या घटना कित्येकदा घडल्या आहेत . अश्या जख्मी वाघाला पकडुन त्याचेवर उपचार करण्याकरीता वनविभागाला तारेवरची कसरत करावी लागते . वनविभागाने त्वरित तोडगा काढला नाही तर नाहकच किती बळी जातील हा यक्ष प्रश्न जनतेसमोर पडला आहे.कुणाचा बळी जाण्याची वनविभाग वाट पाहत आहे का . संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर पकडत आहे .