Published On : Mon, Dec 16th, 2019

धर्मपाल मेश्राम मनपाच्या अनुपालन पूर्तता समितीचे अध्यक्ष

Advertisement

महापौरांनी केले गठन : सभागृहातील निर्देशाच्या अंमलबजावणीसंदर्भात ठेवेल प्रशासनावर लक्ष

नागपूर: मनपा सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या चर्चेच्या आणि प्रश्न स्वरूपात विचारलेल्या माहितीच्या अनुषंगाने महापौरांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी प्रशासनामार्फत होते अथवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी अनुपालन पूर्तता समितीचे गठन केले असून समितीच्या अध्यक्षपदी विधी समितीचे सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती केली आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अध्यक्षांसह ही समिती सहा सदस्यांची असून यामध्ये नगरसेविका हर्षला साबळे, दिव्या धुरडे, मंगला गवरे, नगरसेवक संजय बुर्रेवार, महेंद्र धनविजय यांचा समावेश आहे. विधानसभेत असलेल्या आश्वासन पूर्तता समितीच्या धर्तीवर महानगरपालिकेतही अशी समिती असावी, यासाठी २० नोव्हेंबर २०१७ रोजी ठराव घेण्यात आला होता. तेव्हा तत्कालिन सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे अधिकार महापौरांना प्रदान करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये महापौरांना प्राप्त अधिकारानुसार उपरोक्त समितीचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी पुनर्गठन केले असून अध्यक्ष म्हणून. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जनतेचे प्रश्न नगरसेवक सभागृहात मांडतात. त्यावर महापौरांच्या वतीने निर्देश देण्यात येतात. मात्र, या निर्देशाची अंमलबजावणी होते अथवा नाही, याची माहिती अनेकवेळा नगरसेवकांसह जनतेलाही होत नाही. त्यामुळे प्रशासनावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जनहितार्थ घेतलेल्या गेलेल्या निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे कार्य ही समिती करेल.

Advertisement
Advertisement