Advertisement
कन्हान : – महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) जिल्हा शाखा नागपुर व्दारे नवनिर्वाचित जिल्हा परिष द नागपुर अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे व उपाध्यक्ष श्री मनोहरजी कुंभारे यांचे अभिनंदन करून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच ग्रामसेवक संवर्ग अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाषभाऊ धारपूरे, जिल्हा सरचिटणीस श्री हरिभाऊ लोहे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री किशोर अलोने, श्री चिटकुलवार, श्री बोबडे, श्री रविंद्र निशाने, श्री नाकाडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख उदय चांदूरकर सह ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
Advertisement