Published On : Tue, Jan 21st, 2020

मुलांना खेळण्यासाठी मैदाने विकसीत करा : अभय गोटेकर

Advertisement

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत निर्देश

नागपूर: शहरातील उद्याने विकसीत केली जात आहेत. मात्र लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने मुले घराबाहेर पडत नाही. मोबाईलच्या विश्वातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना हक्काची खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यादृष्टीने विचार करून मुलांना खेळण्यासाठी मैदाने विकसीत करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

Advertisement
Advertisement

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची विविध विषयांसंदर्भात मंगळवारी (ता.२१) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर यांच्यासह उपसभापती किशोर वानखेडे, सदस्या विद्या मडावी, सोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, सदस्य जितेंद्र घोडेस्वार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, महादेव मेश्राम, राजेश भुतकर, धनंजय मेंढुलकर, सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उपअभियंता श्रीकांत देशपांडे, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे आदी उपस्थित होते.

शहरातील अनेक उद्याने विकसीत केली जात आहेत. उद्यानांमध्ये ज्येष्ठांसाठी वॉकींग ट्रॅक तयार केले जाते. मात्र लहान मुलांना खेळाण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे मैदानांचा विकास होणे आवश्यक आहे. शहरात अनेक ठिकाणी जुने मैदान, उद्यानांच्या जागा आहेत या ठिकाणी मैदाने विकसीत करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापतींनी दिले.

शहरात असलेल्या मोबाईल टॉवरच्या कारवाईचाही यावेळी सभापतींनी आढावा घेतला. २०१५ नंतरच्या सर्व अवैध मोबाईल टॉवरवर नियमानुसार ५३च्या नोटीस अंतर्गत कारवाई करण्याचे त्यांनी निर्देशित केले.

उद्याने विकसीत करण्यासंदर्भात स्थापत्य समिती उपसभापती किशोर वानखेडे यांनी प्रभाग ३८मधील वासुदेवनगर, स्टेट बँक कॉलनी, विनायक नगर, एकात्मता नगर, सत्यम नगर तर सदस्य जितेंद्र घोडेस्वार यांनी विनायक लेआउट येथील रमाई उद्यान, वैशाली नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, महालक्ष्मीनगर, अयोध्या नगर यासह इतर उद्यानेही विकसीत करण्याचा सभापतींपुढे प्रस्ताव मांडला.

२०० चौ.मी.पर्यंतच नकाशांना झोनस्तरावर मंजुरी
२०० चौरस मीटर पर्यंत इमारत बांधकामाच्या नकाशाची मंजुरी नागपूर सुधार प्रन्यासमधून घ्यावी लागते. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी या नकाशांची मंजुरी झोनस्तरावर देण्यात यावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले. झोनस्तरावर नकाशा मंजुर झाल्यास नागरिकांना मोठी सुविधा होईल. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल व बांधकाम नकाशेही लवकर मंजुर होतील, असे ते म्हणाले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यास लेआउट मधील व शहरी भागातील मंजुरीकरिता आलेले बांधकाम नकाशे व मंजुर झालेल्या बांधकाम नकाशे आणि प्राप्त झालेले उत्पन्नाचा सभापतींनी आढावा घेतला.

रोडवरील बाजारांवर कारवाई करा
शहरात अनेक ठिकाणी रोडवर आठवडी बाजार भरतो. मुख्य मार्गापर्यंत आलेल्या या बाजारांमुळे वाहतुकीचा त्रास वाढत आहे. शिवाय अपघाताचा धोकाही वाढत आहे. रस्त्यावर भरणारे बाजार अवैध असून यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर यांनी निर्देशित केले. याशिवाय बस स्थानक परिसरात मनपाच्या जागेवर अवैधरित्या सायकल स्टँड लावून नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत. याबाबतही संबंधित विभागांद्वारे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement