Published On : Tue, Jan 21st, 2020

नंदीवर्धन विद्यालय नगरधन येथे सुवर्ण महोत्सवाचा शुभारंभ थाटात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण. उपस्थितांचे वेधले लक्ष .

रामटेक: नंदिवर्धन प्राथमिक माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालय नगरधन येथे नुकताच सुवर्ण महोत्सवचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला.रामटेक विधानसभा क्षेत्रचे आमदार ऍड.आशिष जयस्वाल यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले..

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यटक मित्र चंद्रपाल चोकसे हे होते ह्यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य दुधीराम सव्वालाखे , जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे , पंचायत समिती सदस्य शंकर होलगीरे . पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, गटशिक्षानाधिकारी संगीता तभाने ,नवनियुक्त पंचायत समिती सभापती,सौ कला उमेश ठाकरे ,उपसभापती कुंभरे , सरपंच प्रशांत कामडी , सार्वजनिक ग्राम विकास मंडळ चे सर्व पदाधिकारी तसेच नंदीवर्धन विद्यालयाचे प्राचार्य दिपक मोहोड , व सर्व शिक्षक, शिक्षिका वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थीनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

अध्यक्ष महोदय यांनी द्वीप प्रज्वलन करुन नंदीवर्धन विद्यालयाचे ५० वें वर्षाचे यश या विषयी शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या आंतरिक कौशल्य लेझिम व डमलेश या कार्यक्रमा चे आयोजन केले .


तसेच उद्घाटन समारंभाचे संचालन सौ अमृता कडूकर म्याडम तसेच सांस्कृतिक प्रमुख अरुण जाधव सर यांनी केले . व सर्वांचे आभार प्रदर्शन मिनाज पवचातोड सरांनी केले. तसेच विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्षनी चे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले.

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रावण बावनकुळे, सचिव नामदेवराव कडुकर यांनी आपल्या भाषणात शाळेची उत्तरोत्तर प्रगती कशी झाली व पुन्हा अत्याधुनिक सुविधा युक्त शाळा कशी करण्यात येईल या कडे लक्ष वेधले.आलेल्या पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्षणीची व सांस्कृतिक कार्यक्रमाची व विद्यार्थ्यांच्या कलागुणांची स्तुती केली.भूषण कडुकर यांनी आलेल्या अतिथीचे आभार मानले.