Published On : Mon, Jan 1st, 2018

मालमत्ताकराबाबत नववर्षात मनपाने दिले लॉलीपॉप युवक काँग्रेसच्या रस्ता रोको आंदोलन

Advertisement

नागपूर: नागपूर महानगर पालिकेच्या विशेष सभेत घेतलेला निर्णय आज फिरविण्यात आला.नववर्षात महापौरांनी दिलेल्या लॉलीपॉप च्या निषेधार्थ नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व युवक कांग्रेस मध्य नागपूरचे महासचिव फरदीन गनी खान,सागर बैस ठाकूर, सोशल मिडियाचे उपाध्यक्ष शाहबाज खान चिस्ती यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस आंदोलन करुन रस्ता रोको केला व लॉलीपॉप वाटण्यात आले.नागरिकामधे ईतका रोष होता की ते सुद्धा या रस्ता रोको आंदोलन सहभागी झाले.

मालमत्ता कराबाबत सवलत देणाच्या प्रस्तावाला सभागृहात मंजूरी देण्यात आली.पण आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तात जे करदाता आक्षेप देण्यात आली.पण अजुन पर्यंत बऱ्याच करदात्यांना डिमांड मिळाल्या नाही.तर ते आक्षेप कसे घेतील ? या बाबत नागरिकांमधे आक्रोश आहे.महापौर सभागृहात एक व बाहेर एक असे निर्णय घेऊन पहिलेच धास्तावलेले करधारक यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांनी मागणी केली आहे की पहिले पाठविलेले डिमांड रद्द करुन नव्याने नियमाप्रमाणे फेरमूल्यांकन करुन करदात्यांना त्यांच्या घरी डिमांड देऊन तेथेच आक्षेप मागवावा व त्यांना ब्लू प्रिंट द्यावी जेणे करुन करदात्यांना सोयीचे होईल.

भारतीय जनता पार्टीचे केंद्रात,राज्यात व मनपात सत्ता आहे.केंद्र पातळीवर प्रधानमंत्रीनी लॉलीपॉप दिले.काळा पैसा,रोजगार मुख्यमंत्र्यांनी केलेली फसवी कर्जमाफी व आपल्याच मंत्र्यावर भ्रस्टाचाराचे आरोप पुराव्यासहित असतांना क्लीनचीट देणे व महानगर पालिकेत महापौर दिशाभूल करुन खोटे-खोटे आश्वाशन देत आहे.या विरोधात नागपूर लोकसभा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे व जनता आता जागृत झाली आहे.

याची प्रचित या सत्ताधाऱ्यांना लवकर येईल असे बंटी शेळके म्हणाले.आजच्या या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव शिल्पा बोडखे,महिला युवक काँग्रेस अध्यक्ष विक्टोरिया फ्रांसिस,लालबहादुर शास्त्री फोरमचे अध्यक्ष अबुबकर खान,शाहनवाज़ शेख,स्वप्निल बावनकर,राजेंद्र ठाकरे,विशाल वाघमारे,मोइस खान, फ़ैज़लूर रहमान कुरैशी, स्वप्निल ढोके, अक्षय घाटोळे,नीलेश देशभ्रतार,वसीम शेख,रिज़वान रुवमी,नावेद शेख,निखिल बालकोटे, हेमंत कातुरे,सागर चव्हाण, पूजक मदने,आशीष लोनारकर,विजय मिश्रा,शब्बीर अहमद,विलायत खान,अतुल मेश्राम,नितिन गुरव व इत्यादी कार्यकर्ते उपस्तिथ होते.