Published On : Mon, Sep 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी नवी मतदार यादी प्रक्रियेला सुरुवात

Advertisement

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे सदस्य श्री. अभिजित गोंविदराव पंजारी यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यानिमित्ताने भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करून नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आयोगाने १२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार हा संपूर्ण कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रमुख तारखा –

  • ३० सप्टेंबर २०२५ : अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध
  • १५ ऑक्टोबर २०२५ : वर्तमानपत्रातील पहिली पुनर्प्रसिद्धी
  • २५ ऑक्टोबर २०२५ : वर्तमानपत्रातील दुसरी पुनर्प्रसिद्धी
  • ६ नोव्हेंबर २०२५ : प्रारूप मतदार यादीसाठी हस्तलिखिते व छपाई
  • २० नोव्हेंबर २०२५ : प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी
  • २५ नोव्हेंबर २०२५ : दावे-हरकती सादर करण्याची अंतिम तारीख
  • १० ते २५ डिसेंबर २०२५ : दावे-हरकतींचे निपटारा व पूरक यादी तयार
  • ३० डिसेंबर २०२५ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना –

  • पदवीधर मतदार संघासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय उपलब्ध आहे. नोंदणी करताना स्वतःचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल व OTP पडताळणीनंतर अर्ज सादर करता येईल.
  • सामूहिक (Bulk) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मात्र घरातील नातेवाईकांचे अर्ज सहमती प्रमाणपत्रासह एकत्रित सादर करता येतील.
  • राजकीय पक्ष किंवा संघटनांकडून आलेले एकत्रित अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

जबाबदार अधिकारी –

  • मुख्य मतदार नोंदणी अधिकारी : श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी (विभागीय आयुक्त, नागपूर)
  • सहाय्यक अधिकारी : सर्व जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी

मतदार संघाचा आवाका –

  • एकूण ६ जिल्हे : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
  • सहाय्यक नोंदणी अधिकारी : ४३
  • पदनिर्देशीत अधिकारी : २५६

२०२० मधील आकडेवारी –

  • एकूण मतदार संख्या – २,०६,४५४
    • पुरुष : १,२५,४३९
    • महिला : ८०,९७६
    • इतर : ३९
  • मतदान केंद्रांची संख्या : ३२२

अधिक माहिती व नोंदणीसाठी ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement