मुंबई: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा नवीन नियम लागू केला आहे. योजनेच्या आर्थिक भारात वाढ आणि बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या नियमांनुसार आता लाभार्थी महिलेसोबत तिच्या पती किंवा वडिलांची e-KYC करणे अनिवार्य केले गेले आहे.
वार्षिक उत्पन्नाची पडताळणी-
पूर्वी योजनेसाठी फक्त महिला लाभार्थींचे उत्पन्न तपासले जात होते, पण आता पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्नही पाहिले जाईल. जर लाभार्थी विवाहिता असेल, तर पतीचे; अविवाहित असल्यास वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल. एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास महिला लाभार्थी योजनेसाठी अपात्र ठरवली जाईल.
मुख्य अट: लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. अनेकदा महिला स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न तपासणे बंधनकारक केले गेले आहे.
e-KYC प्रक्रिया कशी कराल?
लाभार्थ्यांनी https://
यानंतर लाभार्थी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून त्यांची e-KYC देखील पूर्ण करेल. लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा आणि कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे व फक्त एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे प्रमाणित करावे लागेल. Submit केल्यावर यशस्वीरित्या e-KYC पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल.
हा नवीन नियम लाडकी बहीण योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी आणि खरी गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी लागू केला गेला आहे.