नागपूर – शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि प्रसिद्ध बाजारांपैकी एक असलेल्या सीताबर्डी मेन रोडवरील पार्किंगसाठी आता नवी आणि स्पष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत या रस्त्यावरील सुमारे 70 वर्ष जुने अतिक्रमण हटवण्यात आले असून, यानंतर वाहने पार्क करण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही नवी अधिसूचना 19 मे 2025 पासून लागू होणार आहे आणि पुढील आदेशापर्यंत प्रभावी राहील.
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था:
वैरायटी स्क्वेअर येथील बाला फुटवेअर ते राजा ऑप्टिकल्स – रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग.
सिल्की लॉन्जरी दुकान ते खादी ग्रामोद्योग दुकान – रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग.
जोशी आईस्क्रीम ते जुन्या पारेख ज्वेलर्स दुकान – रस्त्याच्या डाव्या बाजूला पार्किंग, मात्र राजाराम लायब्ररी गेटसमोरचा भाग, मंदिर बाजारकडे जाणारी गल्ली आणि श्री राकेश तेलंगे यांच्या घरासमोरचा गेट यातून वगळण्यात आले आहेत.
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था:
वैरायटी स्क्वेअर येथील बाटा शोरूम ते नोवेल्टी – रस्त्याच्या उजव्या बाजूला पार्किंग.
बॉम्बेवाला दुकान ते ड्रीम शॉपी – रस्त्याच्या उजव्या बाजूला पार्किंग.
वेंकटेश मार्केट ते पारेख ज्वेलर्स दुकान – या दरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूला दोपहिया वाहने पार्क करता येतील. मात्र मोदी क्रमांक 1, 2 आणि 3 या गल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पार्किंगला परवानगी नाही कोणत्याही फेरीवाल्यांना वरील नमूद रस्त्यांपासून आणि मोडांपासून 30 मीटरच्या परिसरात दुकान किंवा टपरी लावण्यास परवानगी नसेल.
ही माहिती स्थानिक दुकानदारांकडून देण्यात आली असून, वाहतुकीला शिस्तबद्ध करण्यासाठी व नागरिकांना पार्किंगसाठी सोयीस्कर जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.