Published On : Mon, Aug 5th, 2019

नवीन कामठी पोलिसांनी दिले 25 गोवंश जनावरांना जीवनदान, तीन आरोपी अटकेत,

Advertisement

मुख्य म्होरके आरोपीं अजूनही अटकेबाहेर

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावरून एका दहाचाकी ट्रक ने कामठी येथील अवैध कत्तलखान्यात कत्तलीसाठी जात असलेल्या 25 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही नवीन कामठी पोलिसांनी आज सकाळी 7 वाजता केली असून या कारवाहितुन 12 लक्ष 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस स्टेशन चे डी बी पथक लिहिगाव मार्गावर गस्तीवर फिरत असताना वेळीच गुप्त बातमीदार ने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी त्वरित सतर्कता बाळगत महालगाव ते लिहिगाव मार्गावरील कल्याणी राईस मिल समोरील रस्त्यावर बॅरिकेट लावून नाकाबंदी करीत कामठी कडे येत असलेले दहा चाकी ट्रक क्र एम एच 40 वाय 1679 थांबविले असता ट्रकचालक व इतर दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शिताफीने या तिन्ही आरोपीला ताब्यात घेत यश गाठले व ट्रकमधील निर्दयतेने बांधून ठेवलेले व कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असलेले 25 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिले.

या कारवाहितुन दहाचाकी ट्रक व 25 गोवंश जनावरे असे एकूण 12 लक्ष 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करोत अटक तिन्ही आरोपिवर गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक आरोपीचे नाव शेख बब्बू शेख मुसा वय 34 वर्षे रा यशोधरा नगर नागपूर, अजहर कमाल बेग वय 22 वर्षे, हौसलाल लालाजी उईके वय 50 वर्षे दोन्ही रा.गाव चंगेरा गोंदिया असे आहे तर ही गोवंश जनावरे तस्करी फरीद साहब व इतर साथीदार यांच्या सांगण्यावरून होत असल्याच्या माहितीवरून हे म्होरके आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.

तर कत्तलीसाठी जात असलेल्या गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , सहाययक पोलीस आयुक्त राजेश परदेसी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार,मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर , सुरज भारती, सतीश ठाकूर,सुधीर कनोजिया यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी