Published On : Sun, Jul 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

कामठी न्यायालयातून पसार झालेल्या सराईत आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

Advertisement

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पावंनगाव-घोरपड मार्गावरील नहराच्या कडेला हातात शस्त्र घेऊन लुबाडणूक कारण्याच्या बेतात असलेल्या आरोपिना त्वरित अटक केल्याने आरोपींचा लुबाडणुकीचा प्रयत्न फासल्याची घटना सात जानेवारी 2021 ला घडली असता या घटनेतील आरोपिकडून शस्त्रसाठा सह दुचाकी जप्त करून अटक आरोपी विरुद्ध भादवी कलम 399, 4/25 आर्म एक्ट अंनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्या प्रकरणसह अन्य इतर गंभीर गुन्हे दाखल असलेलया तीन आरोपीना आज 30 जुलै 2022 ला कामठी न्यायालयात पेशी तारखेवर हजर केले असता या तीन आरोपीमधून एका सराईत गुन्हेगाराने संधी साधून कामठी न्यायालयातून पसार झाल्याची घटना दुपारी 1 वाजुन 15 मिनिटांनी घडली होती दरम्यान नवीन कामठी पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

या आरोपीच्या शोधकार्याला पोलिसांनी दिलेल्या गतीतून सदर पसार आरोपीस कामगार नगर मधून अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव शेख जाफर शेख मुजाफर वय 35 वर्षे रा.कामगार नगर कामठी असे आहे.तर यासंदर्भात फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर अटक आरोपी विरूध्द भादवी कलम 330/22,कलम 224 अंनव्ये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भादवी कलम 399 अंनव्ये दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी नामे शेख जाफर शेख मुजाफर, शेख शबिब, मो आबीद उर्फ चाटी सर्व राहणार कामठी हे नागपूर च्या मध्यवर्ती कारागृहात पोलीस न्यायालयीन कोठडीत होते.यातील तीनही आरोपींची आज 30 जुलै ला कामठी च्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात पेशी तारीख असल्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी हे या तिन्ही आरोपीना कामठी च्या न्यायालयात दुपारी 1 वाजता आणून न्यायाधीश कोटणीस यांच्या न्यायालयात हजर करायला नेत असता दारातच न्यायाधीश उपस्थित नसल्याचे कळताच उपस्थित संबंधित पोलीस कर्मचारी वार्तालाप करण्यात व्यस्त असल्याचे संधी साधून या तीन आरोपी मधील सराईत गुन्हेगार असलेला मो जाफर नामक आरोपीने स्वतःला हतकडी व दोरमुक्त असल्याचे संधी साधून कोर्टातून पळ काढला असता उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र सदर सराईत गुन्हेगाराने न्यायालय इमारतीच्या पाठीमागील झाडीझुडपीतून पळ काढण्यात यश गाठले होते.सदर घटनेची माहिती हवेसारखी पसरताच सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता.

तर नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ माजली होती.याप्रसंगी डीसीपी सारंग आव्हाड,एसीपी नयन आलूरकर यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे , डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी डी बी पथक,तसेच पोलीस कर्मचारी संजय पिल्ले,राजु टाकळीकर यांनी यशस्वी भूमिका साकारून आरोपीस त्याच्या राहत्या घरातील परिसरातून अवघ्या तीन तासात अटक करण्यात यश गाठले.

Advertisement
Advertisement