Published On : Thu, Apr 15th, 2021

नवीन कामठी पोलिसांनी दिले 63 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव गावच्या पुलियाजवळ नागपूर च्या दिशेने जात असलेल्या एक दहा चाकी शेंदरी व निळ्या रंगाच्या कंटेनर ज्यावर ओम लॉजीस्टिक लिहीलेला ट्रक क्र यु के 06 सी ए 8012 ने 63 गोवंश जनावरे निर्दयतेने अवैधरित्या वाहून नेत असता नजरपाळी ठेवून असलेल्या रात्रगस्त चे पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री 10 वाजता सदर ट्रक ताब्यात घेत ट्रक मध्ये अवैधरित्या वाहून नेत असलेले 63 गोवंश जनावरे नजीकच्या कामठी येथील गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जात असलेल्या 63 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कामगिरी नवीन कामठी पोलिसानो केली असून या धाडीतून आरोपी मो जाकीर मो जहीर वय 40 वर्षे रा भोपाल ला ताब्यात घेत त्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवुन अटक करण्यात आले.तसेच या धाडीतून 63 काळ्या पिवळ्या रंगाचे गोवंशीय जनावरे किमती 12 लक्ष 60 हजार रुपये व ट्रक किमती 15 लक्ष रुपये असा एकूण 27 लक्ष 60 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाहो डीसिपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे राजेंद्र टाकलीकर, मंगेश यादव, मंगेश लांजेवार,संदीप गुप्तता, उपेंद्र यादव, सुधीर कनोजीया यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी