Published On : Thu, Apr 15th, 2021

29 किलो 100 ग्राम गांजासह आरोपी अटकेत

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कॅन्टमेंट एरिया बंगला नं 75 येथे दोन आरोपी हे होंडा कंपनीची ग्रे रंगाची एकटीवा गाडी क्र एम एच 40 बी व्ही 9557 ने एक लाल रंगाची बॅग व एक प्लास्टिक ची बोरी घेऊन त्याचे जवळील असलेल्या प्लास्टिक च्या बोरीतील पुडका देत असताच पाळीवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर बॅग व बोरो मधून एकूण 29 किलो 100 ग्राम गांजा किमती 2 लक्ष 91 हजार रुपये व एक ऍक्टवा दुचाकी किमती 60 हजार रुपये 2 महागडे मोबाईल किमती8 हजार 800 रुपये असा एकूण3लक्ष 59 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तीन आरोपीवर गुन्हा दाखल करीत दोन आरोपीना अटक करण्यात आले तर एक पसार आरोपी अटकेबाहेर आहे.अटक दोन आरोपी मध्ये फिरदौस उर्फ फिरोज खान वय 32 वर्षे रा कोळसा टाल कामठी , महेंद्र मेश्राम वय 76 वर्षे रा कॅन्टोन्मेंट कामठी असे आहे तर पसार आरोपीमध्ये मोहम्मद शारीक जमाल वय 28 वर्षे रा कोळसा टाल कामठी असे आहे।

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी रोशन पंडित , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय रामदास पाटील, किशोर मालोकर, अश्विन साखरकर, विक्की गजभिये, डी बी पथकाचे तंगराजन पिल्ले,गयाप्रसाद वर्मा, प्रीतम मेश्राम, रमेश बंजारा आदींनी मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी