Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा नवा अध्याय; शुभेंदू अधिकारी होणार मुख्यमंत्री

अमित शाहांनी केली अधिकृत घोषणा
Advertisement

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ घडत असून अखेर मुख्यमंत्रीपदाच्या नावावर सुरू असलेला सस्पेन्स संपला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी कोलकात्यात अधिकृत घोषणा केली. उद्या, 9 मे रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक परेड ग्राउंडवर शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 207 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला. या निवडणुकीत शुभेंदू अधिकारी हे भाजपसाठी सर्वात प्रभावी चेहरा ठरले. त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा 15 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. यापूर्वी 2021 मध्ये नंदीग्राममध्येही त्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले होते.

दरम्यान, कोलकात्यातील परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

विधायक दलाचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर शुभेंदू अधिकारी आज संध्याकाळी भाजप नेत्यांसह राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होत असल्याने देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.