Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

“भेल” कडून सीएसआर अंतर्गत औषधांचा साठा महापौरांना सुपूर्द

नागपूर महानगरपालिकेला मधुमेह व रक्तदाबावरील औषधांची वैद्यकीय मदत
Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) भेल च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मधुमेह, रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांवरील औषधांची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. औषधांचा साठा महापौर मा. निता ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला.

महापौर कार्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात खासदार श्रीमती. मायाताई ईवनाते, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मा.स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती. मनिषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकित, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, भेलचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. मनोज कुमार शाह, वित्त व्यवस्थापक श्री.पवन अग्रवाल, वरिष्ठ कार्यकारी श्री.प्रवीण कुजूर, मनपाचे नगरसेविका श्रीमती. माधुरी फुलसुंगे, नगरसेविका श्रीमती. योगिता तेलंग, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल अधिकारी डॉ. अतिक खान तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती. निता ठाकरे यांनी भेल कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भेलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या ५१ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC) तसेच १०२ शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रांना (UHWC) ही औषधे नि: शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये रक्तदाब नियंत्रणासाठी Amlodipine व Telmisartan तसेच मधुमेहासाठी Glimepiride व Metformin या औषधांचा समावेश आहे. यावेळी भेलचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. मनोज कुमार शाह यांच्या हस्ते सुमारे 5 लाख रुपयांच्या औषधांची वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना आवश्यक औषधे सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

कार्यक्रमाच्या प्रारंभी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपक्रमाबाबत प्राथमिक माहिती दिली. तसेच भेल कडून आरोग्य विभागाला मिळणाऱ्या सहकार्याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.