नागपूर -देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेली NEET 2026 परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने हा मोठा निर्णय जाहीर केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत केली जाणार आहे.
३ मे रोजी देशभरात NEET 2026 परीक्षा घेण्यात आली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दावे समोर आले. विविध राज्यांतून पेपरफुटीच्या तक्रारी वाढत गेल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. प्राथमिक तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्याने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
NTA कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज किंवा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. तसेच ३ मे रोजी ज्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्याच केंद्रावर पुन्हा परीक्षा देता येणार आहे. पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने केलेल्या तयारीनंतर आता पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने मानसिक ताण वाढला आहे.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द होणे हे शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता सीबीआय चौकशीतून नेमके दोषी कोण, पेपर कसा फुटला आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत होते, याचा उलगडा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिरंगे के रंगों में जगमगा उठा रत्नागिरी #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news
हरी मिर्च के भाव ने किसानों की बढ़ाई चिंता #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...
अकोला पश्चिम चुनाव विवाद में स्ट्रॉन्ग रूम फिर खुली #maharashtranews #vidarbhanews #newsupdate...
CJP–NALSAR विवाद: छात्रों के विरोध से BCI के फैसले तक...
गोदाम का दरवाजा तोड़कर डेढ़ लाख का वायर साफ #nagpurnews #nagpur #crimenews
गर्भपात और कामोत्तेजक दवाइयों की बिना लाइसेंस बिक्री का आरोप #nagpurnews #news





