Published On : Sun, Sep 15th, 2019

पार्सलमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज- बीडीओ सचिन सुर्यवंशी

Advertisement

खैरी ग्रामपंचायत प्रथम पुरस्काराने सम्माणीत

कामठी :-दैनंदिन जीवनातील प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरास मानवाची पार्सलमय जीवनशैली कारणीभूत असून याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात प्लॅस्टीकच्या ढिगा-यात पर्यावरण नामशेष होऊन जाईल अशी भीती कामठीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानच्या तालुकास्तरीय पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर करतानाच पार्सलमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19 या वर्षामधील निवडलेल्या उत्कृष्ट प्रभाग तसेच जिल्हा परिषद गट स्तरावरील प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त खैरी, तरोडी, महालगाव , खसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांचा सन्मानपत्र व प्रत्येकी पन्नास हजार रूपये तसेच प्रशस्त्रीपस्त्र सह शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी खैरी ग्रामपंचायत चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यासह तरोडी, महालगाव, खसाळा ग्रा प चा बीडीओ सचिन सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते सम्माणीत करण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारि टेंभुरने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरविंद अंतुरकर, यासह तालुक्यातील समस्त ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंचसह सदस्यगण तसेच पंचायत समिती कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे , संचालन पृथ्वीराज डोंगरे तर आभार मनीष दीघाडे यांनी मानले.

संदीप कांबळे कामठी