Published On : Sun, Sep 15th, 2019

येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही :- पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे

कामठी :-, सन 1997 मध्ये माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू करण्यास येरखेडा गावकऱ्यांचे फार मोठे मोलाचे सहकार्य आहेत त्यामुळे येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची गाव्ही राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येरखेडा ग्रामपंचायत च्या वतीनेआयोजित विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले

28 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दिपप्रवजलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. यावेळी कामठी पंचायत समितीच्या माजी उपसभापती देवेंद्र उर्फ बाळू गवते , कामठी विधानसभा क्षेत्राचे विस्तारक नरेश मोटघरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे, उपसरपंच शोभा कराळे,रनाळा ग्रामपंचयतचे सरपंच सुवर्णा साबळे ,उपसरपंच आरती कुलरकर् , पंकज साबळे, लिहिगावचे सरपंच गणेश झोड, नेरी ग्रा प चे माजी सरपंच डूमदेव नाटकर ,खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे , अरुण पोटभरे, कोविद तळेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले सन 1997मध्ये मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा असताना येरखेडा गावच्या गावकऱ्यांनी मला मोठ्या प्रमाणात मतदान करून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात करण्यास मोठे मोलाचे सहकार्य केले आहे

Advertisement

त्यामुळे येरखेडा गावाचा सर्वाणगीन विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धत करून देणार आहे,ज्या नागरिकां कडे पक्के घर नाही त्यांनी पंतप्रधान आवास योजना,,प्रधानमंत्री आयुष्यमानयोजनेचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घावा, येरखेडा अप्रोच चारपदरी सिमेंटचा होणार असून या मार्गाने पथदिवे लावण्यात येणार असल्याचे सांगितले,सोबतच सिमेंट रोड नाल्या बाधकामासा दीड कोटी रुपये निधी देणार असल्याचे सांगितले,पाणीपुरवठा योजनेचे नळ कनेक्शन घरोघरी लावण्या साठी दिड कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले येरखेड्याच्या सर्वाणगीन विकासाकरिता आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलभद करूनदेणार असल्याचे सांगितले ,

आगामी वर्षभऱ्यात येरखेडा रनाला नगरपरिषद होणार असून नगरपरिषदेच्या च्या माध्यमातून येरखेडा रनाला गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे जाहीर केले कार्यक्रमादरम्यान पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते येरखेडा येथील 10, 12 वि बोर्ड परीक्षेतही गुणविध्यार्थ्याचा समुर्थी चिन्ह पुसहप्गूच देऊन सत्कार करण्यात आला , पालकमंत्र्याचे हस्ते बचत गटातील महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मंगला कारेमोरे यांनी केले संचालन ग्रामविकास अधिकारी उत्तम झेलगोंदे यांनी केले व आभार प्रदर्शन माजी सरपंच मनीष कारेमोरे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल भोयर ,घनश्याम नवधींगे अमोल घडले प्रवीण लुटे नितीन इरपाते, नरेश मोहवे गजानन तिरपुडे ,सुमेध दुपारे, पूजा भोयर ,मंगला पाचे पौर्णिमा बर्वे ,निकिता पाटील ,वनिता नाटकर, सारिका कनोजे ,साईस्था प्रवीण, राजकिरण बर्वे, रिजवान शेख रमण पाचे सचिन भोयर गौरव कराळे, अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement