Published On : Sun, Sep 15th, 2019

जीवोदय फाऊंडेशन तर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप

Advertisement

पाराशिवनी जीवोदय फाऊंडेशन पारशिवनी तर्फे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्य वाटपाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर मेंघर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत पारशिवनी च्या नगरसेविका माजी महिला बालकल्याण सभापती अनिता भड, गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे, गट शिक्षणाधिकारी विलास काटोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाघ, बाल विकास अधिकारी वनिता काळे मॅडम,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते दिवाकर भोयर, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, स्नेहलता कोचर यांनी सामाजिक दातृत्वाचा भावनेतून केलेल्या आर्थिक मदतीेतून पारशिवनी परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना म्याग्निफायर ग्लास, चष्मे, कर्णयंत्र, व्हील चेअर, पांढरी काठी इत्यादि साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम सूत्रसंचालन जीवोदय चे सचिव खुशाल कापसे यांनी, प्रास्ताविक विशेष फिरते शिक्षिका चैताली खंगार यांनी तर आभार प्रदर्शन जीवोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली काकुनिया यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. इरफान पठाण, गोपाल कडु पत्रकारू,मस्के मॅडम, संतोष बोरकर, जया मोटघरे,डॉः माधुरी बावनकुळे, सारिका जाधव, नीलू भुजाडे, ज्योती तांदुळकर,प्रभा कडू ,राजेश काकूनिया यांनी परिश्रम घेतलेत.

तालुका प्रतिनिधी कमल यादव पारशिवनि