Published On : Thu, Sep 24th, 2020

कोरोना बाधितांसाठी ॲम्बुलन्स हवी…

Advertisement

डायल करा १०२ किंवा १०८ क्रमांक

महानगरपालिकेचेही झोननिहाय नंबर जारी


नागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ ॲम्बुलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने 102 किंवा 108 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी 102 किंवा 108 या टोल फ्री क्रमांकावर वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भातील आज एक पत्रक जारी करत या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमधील खाटांच्या उपलब्धतेबाबत ही प्रशासनाने संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. 0712-2567021 या क्रमांकावर यासाठी संपर्क साधता येणार आहे. महानगरपालिकेने देखील रुग्णवाहिका, शववाहिका या संदर्भात प्रत्येक झोनसाठी दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर (२२४५०५३), धरमपेठ (२५६७०५६), हनुमाननगर (२७५५५८९), धंतोली (२४६५५९९), नेहरूनगर (२७०२१२६), गांधीबाग (२७३९८३२), सतरंजीपुरा (७०३०५७७६५०), लकडगंज (२७३७५९९), आशीनगर (२६५५६०५), मंगळवारी (२५९९९०५) या झोनमधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, गरजेनुसार घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क बांधून, शारीरिक अंतर ठेवून जागरूक असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Advertisement