Published On : Thu, Sep 24th, 2020

मेडिकल फीडर मेनचे १२ तासांचे शटडाऊन शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी

रामबाग, इमामवाडा, अजनी रेल्वे इत्यादी भागांचा पाणीपुरवठा राहणार बाधित

शटडाऊन दरम्यान व नंतर टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील राहणार बंद

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी मेडिकल फीडर मेनवर कॉटन मार्केट येथे ५००मिमी व्यासाचे फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यासाठी शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ९.३० दरम्यान १२ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

या कामामुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील: रामबाग, इमामवाडा, टिम्बर मार्केट, बोरकर नगर, जाटतरोडी नं १, २, ३, इंदिरा नगर, राजाबाक्षा, उंटखाना, ग्रेट नाग रोड, धम्म नगर. कामगार भवन, रामबाग म्हाडा, अजनी रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,टाटा कॅपिटल, SE रेल्वे

या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी व पुरेसा पाणीसाठा करून मनपा-OCWला सहकार्य करावे, ही विनंती.